नांदेड - महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड सावित्री लोकसंचलित साधन केंद्र अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जाणीव जागृती कार्यक्रम नाळेश्वर, सुगाव बु. धनेगाव, जवहार नगर या गावात पार पडला.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात सर्व महिलांनी आपली आरोग्याची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन करावे असे आव्हान करण्यात आले.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग द्वारा राबवण्या येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान लाभ घेण्या बाबत आव्हान करण्यात आले.
राष्ट्रच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिलां आरोग्याची तपसणी, उपचार सेवा, पोषण यावर विशेष भर दिले जाणार असून या अंतर्गत सर्व बचत गटातील महिलांना अभियान मध्ये भाग घेण्याबाबत जाणीव जागृती करण्यात आले.
महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर झाल्या आहेत त्याच बरोबर महिलांनी आरोग्य बाबत सुद्धा साक्षर व्हावे असे सांगण्यात आले.
आपल्या दैनिक कौटुंबिक जबाबदर पार पाडत असताना आपल्या आरोग्य कडे महिलांनी दुर्लक्ष करू नये , कोणताही आजार अंगावर काढू नये, त्वरित उपचार घ्यावे असं आव्हान करण्यात आले.
त्याच प्रमाणे महिलांनी सकस व संतुलित आहार घ्यावे.
असे सांगण्यात आले.जास्तीत जास्त महिलांनी स्वस्थ नारी स्वस्थ परिवार अभियानात भाग घ्यावा असे बचत गटांना आव्हान करण्यात आले. हा कार्यक्रम व्यवस्थापक राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली पार पडला.
कार्यक्रम उदघाटन नाळेश्वर उषाताई बाबुराव वाघ व प्रभावती लोकेवार यांच्या हस्ते झाला या कार्यक्रम प्रसंगी संभाजी मैठे, शशिकला जाधव, नवनाथ फुले, ललिता जोंधळे, मीना कसबे, हर्षदा गजभारे, अर्चना हिवराळे, शर्मिला वाढवे, रमा वैद्य व गाव स्तरावर बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
नांदेड प्रतिनिधी रत्नदीप मदने
0 Comments