खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

सूर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन सेनेतर्फे अभिवादन

भैय्यासाहेबांनी भारतातील बौद्धांना हक्क मिळवून दिले - डॉ.सुशील सूर्यवंशी

सूर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन सेनेतर्फे अभिवादन

सूर्यपूत्र यशवंत उर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकास सूर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी 
छ. संभाजीनगर दि.१७ सप्टेंबर (नागसेनवन) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र म्हणून भैय्यासाहेबानी बौद्धांच्या न्याय हक्काचा लढा उभारून बौद्ध समाजाला हक्क मिळवून दिले, बौद्ध धम्माची पाळेमुळे मजबूत केली.

आज बौद्धांना अनुसूचित जातीच्या मिळणाऱ्या सवलतीचे श्रेय हे केवळ भैय्यासाहेबांचे आहे. महाराष्ट्रात गटबाजी माजलेली असतांना बौद्ध धम्मासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. 
ह्या हक्क अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी जागृत राहिले पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.सुशील सूर्यवंशी यांनी केले, ते रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित नागसेनवन परिसरातील अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी महानगरपालिकेच्या ठरावानुसार सदरील चौकात सूर्यपूत्र यशवंत उर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकास सूर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर नाव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी सचिन निकम यांनी केली आहे.
दि.२५/०५/२०१२ रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने तत्कालीन नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या मागणीवरून विद्यापीठ मार्गाकडून पाणचक्की कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बेटास ठराव घेऊन सूर्यपूत्र यशवंत उर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकास सूर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर नाव देण्याच्या ठरावाला याला मंजुरी दिली आहे. परंतु ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने या बाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी महाराष्ट्र नेते प्राचार्य सुनील वाकेकर, चंद्रकांत रुपेकर, रिविसे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, मराठवाडा सचिव प्रा.सिद्धोधन मोरे,जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष राहुल गवळी, ऍड.सुनील पंडागळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, विनोद वाकोडे, प्रा.देवानंद पवार, प्रा.प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, प्रा.बाळू गायकवाड, आईस्का चे रत्नदीप रगडे, सचिन शिंगाडे, सुनील पांडे, अनिल हिवाळे आदींची उपस्थिती होती.

छ संभाजी नगर प्रतिनिधी: विशाल पठारे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools