भेटणं तुझं माझं
जणू शांत करु पाहतं
मुकी फुले उधळले तरी
अंजली सुमने अश्रूंनी वाहतं
अवस्था अशी माझ्या मनाची
दुरावस्था जशी प्रेमारंभाची
जवळ असूनही तू साजने
भेट मात्र अजून अपूर्णतेची
किती वेळ मी तुजला बोलू
नाही भक्कम वेळ तुला
काय सांगू धाक मनाचा
माझा त्रास माहिती मला
झाली माझ्या मनाची
अशी मुकी फुले
बोलून किती तुला तरी शांत
प्रेम अजून बंद ह्रदयी खुले
हवी तू मला आयुष्यभर
श्वास सुद्धा शेवटी नको
जीवनी माझ्या सोबती हवी
श्वास आपला असो कि नको
भेटणं तुझं माझं
जणू शांत करु पाहतं
मुकी फुले उधळले तरी
अंजली सुमने अश्रूंनी वाहतं
- कवी किरण
भोकरदन जि जालना
सदस्य मराठीचे शिलेदार
0 Comments