दि. *२५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले.*
काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, *"डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..?*
देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..?
पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण;
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे."
*छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता.*
रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच *छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.*
मनुस्मृती दहनाच्या अगोदरच्या दिवशी कोणी डॉ. बाबासाहेबांना आणि त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना महाड या गावात राहायला जागा देत नव्हतं.
तेव्हा एका मुस्लिम बांधवाने जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांची राहण्याची सोय केली.
महात्मा फुले म्हणाले होते, "जेव्हा बहुजन ब्राम्हणांनी लिहिलेलं थोतंड ग्रंथ वाचेल तेव्हा ते जाळून स्वतःचा राजग्रंथ लिहितील."
त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणांची मनुस्मृती जाळली आणि संविधान लिहलं.
"मनुस्मृति"
➖➖➖➖➖➖➖➖➖
२५ डिसेंबर १८७३ साली राष्ट्रपिता
ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हण भटजीला नं बोलावता सीताराम जबाजी आल्हाड, मंजुबाई धानोबा निम्ह्नणकर यांचा आजच्याचं दिवशी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी पहिले सत्यशोधक लग्न पुण्यामध्ये लावले होते आणि 'मनुस्मृती' नाकारली होती... व आजच्याच दिवशी २५ डिसेम्बर १९२७ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी महाड मध्ये 'मनुस्मृती' दहन केली होती...का दहन केली त्याची कारने बघा
1- नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-2 ते 6 पर्यंत.
2- पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये, विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-45
3- संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा "दास" आहेत, स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही,
स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-416.
4- ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत,
म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-8 श्लोक-299
5- असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-66 आणि अध्याय-9 श्लोक-18.
6- स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.
(यामुळे म्हटल्या जाते-"नर्काचे द्वार")
◆मनुस्मृती◆ अध्याय-11 श्लोक-36 आणि 37.
7- यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.
◆मनुस्मृती◆ अध्याय-4 श्लोक-205 आणि 206.
8- मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-214.
9 - स्त्री पुरुषांना दास बनवून
पदभ्रष्ट करणारी असते.
◆मनुस्मृती◆अध्याय-2 श्लोक-214
10 - स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-215
11. - स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-114.
12- स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-115.
13.- स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान,
इर्षाखोर, दुराचारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-17.
14.- सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
(1). स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-115.
(2). पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो, दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-154.
अश्या या गटारगंगा मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील शोषित पिडित बहूजन आणि सर्व जाती जमाती मधील स्रियांवरच नाही तर संपूर्ण भारतीयांवर अनंत उपकार केले आहेत म्हणूनच या पाशवी नियमांमधून सर्वांनाच मुक्ति मिळवून दिली आहे हे निर्विवाद सत्य आहे म्हणून हा खर्या अर्थाने "स्त्री मुक्ति दिन", बहुजन मुक्तीदिन म्हणुन मानल्या जातो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏क्रांतीकारी जय भिम सर्वाना 🙏
0 Comments