शिर्षक - आठवण ती माझ्या बालपणाची
25 डिसेंबर म्हटलं तर नाताळ. जगभरात हा सण खूप जोमाने साजरा केला जातो म्हणजे याचं दिवशी 24 तारखेच्या मध्य रात्री 12:00 वाजता यूरोप च्या धरतीवर प्रभू येशू यांचा जन्म झाला त्यामुळे हा सण यूरोप सह पूर्ण जगात मानला जातो.
लहान असताना घरामध्ये नाताळ सणा बद्दल ऐकायचो असे की एक बाबा लाल रंगाच्या मोठ्या ड्रेसवर येतो आणि सर्व लहाण मुलांना खेळणी देऊन जातो.
असे म्हणायचे कि प्रभू येशू स्वतः सांताक्लॉज च्या वेशभूषा मध्ये यायचे आणि सर्व लोकांना चांगला संदेश देतात.
मला आज हि आठवते जेव्हा हा नाताळ सण येतो तेव्हा माझ्या कॉलनी मधील लोकं नवीन कपडे घालून चर्च मध्ये प्रार्थना करण्यास जायचे व माझ्या मित्रांसोबत मी जायचो.
आठवणी त्या खूप चांगल्या आहेत आज आठवल्या तर लगेचं मी बालपणीच्या त्या सर्व मित्र आणि मैत्रिणींच्या आठवणीत रमून जातो. नाताळ सणात सांताक्लॉज यांना पाहून अगदी मजेत उड्या मारायला वाटतात असे वाटते सांताक्लॉज लगेचं खिशात हात घालून नवीन भेट वस्तू देईल. पण आता त्या जुण्या आठवणी व जुण्या वेळचे सांताक्लॉज पुन्हा पहायला मिळेल असे मला तर वाटत नाही.आता दुनिया खूप बदलली नाताळ सणात सुद्धा कोरोना रोगाने हाहाकार घातलेला आहे त्यामुळे हा सण सुरक्षित राहून अंतर ठेवून साजरा करूया व त्या जुण्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करून सांताक्लॉज च्या दुनियेत थांबायला हवे..
- कवी किरण
९७६२०४९००३
भोकरदन जि जालना महाराष्ट्र
0 Comments