ध्येयवादी माणसे म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो चुकीचे ते आपल्यासाठी आहेत , पण ते त्यांच्यासाठी योग्य आहेत .
ते त्यांची व्यवस्था टिकवण्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पदच आहे .
हो उलट आमच्याकडे घ्या, पटत नाही किंवा वैचारिक वाद झाले की दुसरी संघटना काढली जाते. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात.
आमच्याकडे ध्येय नाही. आमच्याकडे प्रसिद्धी साठी काम केली जातात. मला मोठा म्हणा म्हणून काम केली जातात. एवढेच नाही या समाजातील काही नेते फक्त आपले नाव लोकांपर्यंत जावे यासाठी दररोज स्वतःचा फोटो, नाव आणि स्वतःची माहिती वाट्सअप वर पोस्ट करणे म्हणजे काम समजून जीवन जगत आहेत याउलट RSS चा पुढील नेता कोण हे माहिती नसते पण आमच्याकडे पटले नाही की विभाजित होऊन स्वतः नेता म्हणून जाहीर केले जाते.
ही परिस्थिती आहे आपली. आपण RSS वर टीका जरुर करतो पण काम करण्याचे तंत्र काही शिकत नाही . याला आपण दोषी ठरतो हे ही वास्तव आम्ही समजले पाहिजे. RSS सारखी आमची काम करण्याची पद्धत नाही .
त्यांच्यातला तो संयम , त्यांच्यातील ती जिद्दही आमच्यात नाही , हे प्रामाणिकपणे आम्ही कबूल केले पाहिजे .
आजची परिस्थिती काय?
RSS ने सत्तेत येण्यासाठी अनेक रचनाबद्ध काम केलेली आहेत. त्यातला एक अंश ही काम आमच्याकडे झालेले नाही. RSS ने सत्तेत येण्यासाठी धार्मिक बेस पक्का केलाय. आम्ही मात्र आमचा धार्मिक इतिहास मातीत गाडून टाकलाय.
लोकांना वाटते की आपण चळवळीत काम करतोय. पण नाही आपण आपला स्वार्थ साधत आहोत. का तर , आपल्याला कोणी तरी मोठे म्हणावे आपले कौतुक करावे यासाठीच काम केले जाते.
म्हणूनच आमच्याकडे फुटीरतावादी लोकांचा भरणा झाला.
आमचाच इतिहास माहिती नसल्याने ही अडचण आहे .
आमची फुटीरतावादी लोक निर्माण होण्याला कारणीभूत आम्हीच .
काही लोकांना वाटत असेल की आपण प्रामाणिक काम करतो. पण जिथून आपण शिकतो त्यालाच जेव्हा लाथ मारून जातो तेव्हाच आपला प्रामाणिकपणा लयास गेलेला असतो.
RSS दोन झाल्या नाहीत का नाही झाल्या कारण त्यांचे ध्येय पक्के होते .आमच्याकडे का नाही होत ? कारण आम्ही ध्येयासाठी नाही .
स्वतःच्या नावासाठी काम करतो
ज्यांना बुद्धाचा अनात्मवाद अजून कळला नाही त्यांच्या कडून कोणतीही मोठ्या कामाची अपेक्षा कधीच करता येणार नाही. तो जे काही करणार ते फक्त स्वतः आणि स्वतः साठीच करणारा असतो.
शत्रू बलाढ्य आहेच , पण घराचे भेदी घराची वाट लावत असतात
साहित्याचा आधार घ्यावा तर रावण एवढा बलाढ्य कोणीच नव्हता पण मारला गेला.
तो घरच्यांमुळे आणि बहुजन चळवळीत हेच पाहायला मिळत असलेली शेकडो उदाहरणे आहेत.
आमचे लोक हारतात ते घरच्या लोकांमुळेच .
ज्या दिवशी आमचा सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक बेस पक्का होईल तेव्हाच परिवर्तन शक्य आहे. नाही तर येरे माझ्या मागल्या.
आताच्या पिढी ला किती ही समजावून सांगा त्यांना तुमच्या समजावण्याला तुमचा इगो समजतात .
कारण तुमच्या कामात त्यांना तुमचा इगो दिसतो अहंकार दिसतो तेंव्हा हा इगो नष्ट करणे सगळ्यात पहीले आवश्यक आहे. हाच खरा बुद्धाचा अनात्मवाद होय.
RSS ने आजवर त्यांच्या लाखो पूर्णवेळ कार्यकर्त्यांची साधी ओळख ही या दुनियेला करून दिलेली नाही.
हे आहे बुद्धाच्या अनात्मवाद च्या शिकवणुकीला अनुसरून केलेले कार्य.
आमचे मात्र अगदी याउलट आहे सर्व त्यांनी आता त्या लाखो कार्यकर्त्यांनी काम कसे केले असेल ?
RSS ने आजवर त्यांच्या अनेक सेवकांची नाव पण कधी मीडियात वा कुठे दिलेली नाहीत. त्यांच्या कामाचा साधा उल्लेख ही कुठे केला जात नाही , तरी सकाळी साडे चार ला शिस्तीचे धडे घेत आपण उठायच्या आत ते त्यांची कामपूर्ण करतात.
धडा आम्ही काय शिकला पाहिजे हे यातच सामावलेले आहे .
आम्ही उठायच्या आत त्यांनी त्यांची काम केलेली असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही एक पाऊल चालतोय तर ते 10 पाउल चालतात .आम्हाला 100 पाऊले पुढे चालणारी माणसे तयार करावी लागतील आणि ती माणसे या पिढीत तरी कुठं दिसत नाहीत.
प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या मनातही त्याचा अहंकार कसा जागृत करायचं हे कसब आपल्या लोकात चांगले आहे. अरे तुझेच काय अडले आहे का ? तुझ्यासोबतच असे का केले जाते ? इतरांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. अरे तू पण काम करतो ना , तुझे फोटो कुठे दिसत नाहीत . तू एवढी मेहनत घेतो, तुझे काहीच ऐकून घेतले जात नाही. अरे तुझा अपमान केला जातो तरी तू त्यांच्यात च कसा काम करतो? असे प्रश्न निर्माण करून प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्यात तो इगो तयार केला जातो. स्वाभाविक त्यावेळी मग स्वतःचा इगो हा माणसाला काही ही करण्यास भाग पाडतो व तो विभक्त होण्याच्या वाटचाली कडे मार्गक्रमण करतो.
आता मला सांगा कां चळवळी विभक्त होणार नाहीत का?
आणि जे लोक दिखावा करतात की , आम्ही तुमच्या सोबत काम करू, तुम्ही फक्त हाक द्या .अश्या लोकांचे जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्यांच्यातला उत्साह उणा झालेला दिसतो. म्हणून या पिढीत तो विचार रुजतांना दिसत नाही .
आपण प्रयत्न खूप करतो पण लोकांना त्या प्रयत्नात ही अहंकार दिसून येईल.
पुन्हा RSS का विभागली नाही यावर चिंतन तेही कृतिशील असावे . लक्षात येईल .
आम्ही काय करतो ?
आम्ही केवळ गोंधळ घालतो. RSS कृतिशील काम करते .
आम्ही फक्त दिखावा करतोय. RSS त्यांची काम कोणताही दिखावा न करता करतेय .
आम्हाला जागे करावे लागते. त्यांची माणसे त्यांनी जागी केलीत. आम्ही फक्त एकमेकांचे दोष पाहतो . ते केवळ काम पाहतात व तशी माणसे तयार करतात .
आम्ही केवळ संघटना पाहतो ते त्यांचे ध्येय पाहतात .
म्हणून च RSS आजवर दोन तुकड्यात कधी विभागली नाही पण आम्ही बहुजन चळवळीचे सतराशे साठ भाग करून बसलो .
RSS त्यांच्या कामावर प्रामाणिक आहे .आम्ही मात्र तिथं कुठेच नाही .
वाटत असेल आम्हाला आम्ही प्रबोधनाची चळवळ राबवतो . पण ती समाज सुधारणावादी आहे जी शतकानुशतके चालतच आलीय. बदल काहीच नाही .
आता आपण विचार करावा आम्ही काय करतो ? कां विभागतो आम्ही चळवळ ?
कां आम्ही चळवळीला विभाजित करून कमकुवत करतो? कां चळवळीला आम्ही विभागून आमच्या पिढीचे नुकसान करतो? यावर विचार तर झाला पाहिजे .
(टीप : वरील विषय हा गंभीर असून पावले व्यवस्थित न टाकल्यास भविष्य अंधारात आहे एवढे नक्की .)
वरील लेख वाचून गांभीर्य पूर्वक खालील प्रश्नांची उत्तरे शोधावी व अभ्यासावी.
1. बुद्धाचा अनात्मवाद म्हणजे काय ?
2. एका संघटनेच्या विभाजनाशिवाय धेय्य गाठणे शक्य होईल का?
3. स्वतःचे नावाची व फोटो ची पब्लिसिटी केल्याशिवाय संघटना चालविता येत नाही का?
4. स्वतःचे स्वार्थाचा त्याग केल्या शिवाय समाजाचे हितासाठी कार्य करणे शक्य आहे का ?
5. ज्यांनी एका संघटनेचे विभाजन करून दुसरी संघटना काढली व पहिल्या संघटनेचे विभाजन केले त्यांनी स्वतःचे स्वार्थ साधले की समाजाचे?
6. ज्यांनी संघटना विभाजित केल्या त्यांनी त्यांच्या संघटना विसर्जित करून मूळ संघटनेत समाविष्ट झाल्या शिवाय समाजास मजभूत करता येणार का?
7. स्वार्थ साधू संघटना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने समाजाचे नुकसान केले हे तरी समाजाने जाणून घेतले का?
8.स्वार्थ साधू संघटना प्रमुखांना घरवापसी चा रस्ता दाखविण्यासाठी समाजाने काय उपाययोजना कराव्यात?
निवेदनकर्ता
श्रद्धेय भदंत सुमन वन्नो महाथेरो
अध्यक्ष, चंद्रपुर जिल्हा भिक्खुसंघ
अंतर्गत: अखिल भारतीय भिक्खुसंघ
चंद्रपुर
0 Comments