गुजरातचे मुख्यमंत्री होता तुम्ही तेव्हा तुमचे वाक्य असे होते की देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे .
2014 गेला आता 2021 आहे मोदी जी ...
काय केलं तुम्ही देशासाठी सांगा
द्या एखादे उदाहरण की तुम्ही आणि तुमच्या सरकारने भारतासाठी दोन करोड नौकरी दिली ??
नाही दिली ..
उलट 2014 पासून बरेचं तरूण तरुणी हे बेरोजगार झाले आहे आज देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे पण पाच राज्यात निवडणूका आहे म्हणून तुम्ही स्वतः सभा घेत आहे .
प्रधानमंत्री आहे तुम्ही कारकून नाही
संविधान विरोधात जेव्हा तो देशद्रोही तुमच्या सरकार मध्ये काही तुच्छ लोकं घेऊन संविधान प्रत जाळतो तेव्हा कुठे जातात तुम्ही?
अशा देशद्रोही लोकांना कोण शय देतं तुम्ही जनतेला सांगू शकता का ??
सोडा हो प्रधानमंत्री माझा रोष तुमच्या वर नाही पण तुम्ही ज्या प्रकारे काम करता त्यावर आहे तुम्ही जरी चांगले काम करायचे प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला अशी मंडळी भेटली आहे जी तुम्हाला चांगले काम करू देत नाही. तुमच्या पर्यंत निर्णय येऊ देत नाही .
नरेंद्र मोदी जी हे व्यंगचित्र काढले आहे प्रसिद्ध डेविड रोवे यांनी ते ऑस्ट्रेलिया येथील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. विचार करण्याची गोष्ट आहे आज भारत जगातील असा देश आहे ज्या देशाने महान महान योद्धा आणि महान महापुरूषांचे दर्शन दिले.मग का आपण महापुरूषांचे विचार बाळगून काम करत नाही ??
सर्रास राज्यभर मागासवर्गीय लोकांना छळले जाते , मुलींच्या अब्रू सोबत मज्जाव केला जातो का ??
जो पर्यंत चौकात अशा बलात्कारी लोकांना आपण फासी देत नाही तो पर्यंत असे गुन्हे घडणार व घडत राहील.
देशाला आज गरज ऑक्सीजन बेड औषधी यांची पण आज आपल्या जवळ नाही जी औषधी होती ती आपण इतर देशांना दिली पण आपल्या वर वेळ आली तर अमेरिका सारख्या कपटी देशाने आज सरळ हात वर केला.
भयानक स्थिती झाली हो मोदी जी काही तरी उचित करा नाही तर असे होईल तुम्ही प्रधानमंत्री तर भारताचे असणार पण तुम्हाला प्रधानमंत्री म्हणण्यासाठी या भारतात कोणी राहणार नाही...
गंभीरता समजून घ्या आणि देशासाठी जनतेसाठी लवकर काही तरी चांगले करा.
- किरण आरके
मुख्य संपादक न्यूज 24 खबर
0 Comments