कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पालन करीत 119 लोकांची टेस्ट केली त्यापैकी 14 रुग्ण पॉझिटिव आले.
या तपासणीत लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून आले.
माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनाचे पालन तंतोतंत ग्रामपातळीवर करणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने समिती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे.
याप्रसंगी सरपंच तुषार पाटील, उपसरपंच विठ्ठल शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर मुल्लासाहेब, संपर्क अधिकारी जाधव अंकुशराव, ग्रामसेविका सातपूते, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, ग्रा प सदस्य अमोल गोडगे, डॉक्टर अमोल गोफणे, तलाठी महादेव कांबळे, रेशन दुकानदार दशरथ शिंदे, मुख्याध्यापक बाळासाहेब जायभाए, शिक्षक अरुण पाटील, दयावान पाटील, श्री माळी, आशाताई दिपाली शिंदे, अंगणवाडी सेविका सुप्रिया गोफणे, अंगणवाडी सेविका सुजाता गोफणे, ग्रा प कर्मचारी सेवक संजय जाधव ,व किराणा दुकानदार, दूध डेअरी कर्मचारी, इतर व्यवसायिक, विविध पदाधिकारी, यांनी तपासणीच्या कार्यक्रमास हजर राहून सहकार्य केले..
याप्रसंगी परंडा पोलिस स्टेशनचे पथक अचानक भेट देऊन गावातील परिस्थितीचा आढावा पाहणी करून माहिती घेतली तसेच परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक बिट अमलदार एस एफ मुल्ला मॅडम यांनी मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा घरी रहा सुरक्षित रहा माझ कुटुंब माझी जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.
0 Comments