गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
गडहिंग्लज : मा.श्री राजसाहेब ठाकरे अलगीकरण कोवीड आरोग्य मंदिर गडहिंग्लजला नामदार हसन मुश्रीफ फौउंडेशनकडून 2 आॕक्सिजन काॕन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता,पर्याय म्हणून फाउंडेशनच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप जिल्हाभर केले.
नागेश चौगुले म्हणाले आम्ही सुरु केलेल्या कोव्हीड सेंटरला मुश्रीफ फौउंडेशन कडून दोन आॕक्सिजन काॕन्सन्ट्रेटर मशिन दिलेबद्दल ग्रामविकास मंञी हसन मुश्रीफ साहेब व मुश्रीफ फौउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ साहेब यांचे आभार मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख किरणआण्णा कदम, सुरेश कोळकी, हरुण सय्यद, उदय परीट, गुड्या पाटील, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, संतोष कांबळे, राजू जमादार, दिपक कुराडे, प्रशात शिंदे, तुषार यमगेकर, अमर मांगले,अवधूत रोटे,अक्षय शिंदे, विनायक दोनवडे, आविनाश ताशिलदार, प्रभात साबळे उपस्थित होते..
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments