गडहिंग्लज : तालुक्यातील चिंचेवाडी येथे वनविभागाने तोडलेले लाकडे नेण्यासाठी आलेला ट्रॅक्टर पलटी होऊन प्रदीप पाटील वय 21 राहणार कोळीद्रे हा युवक जागीच ठार झाला
याची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे,
भानुदास व प्रदीप पाटील दोघे लाकडे आणण्यासाठी ट्रॅकटर घेऊन समानगड च्या बाजूला असलेल्या चिंचेवाडी येथे आले होते , चिंचेवाडी च्या उतारास भानुदास हा ट्रॅकटर लावून गेला ट्रॅकटर च्या बाजूला प्रदीप हा उभा होता.
ट्रॅकटर अचानक पलटी होऊन प्रदीप त्याच्याखाली अडकला त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने नाकातून तोंडातून रक्त येऊन जागीच ठार झाला , याची तक्रार विठ्ठल पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली असून भानुदास ह्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व याचा तपास हवालदार संभाजी कागेकर करत आहे , प्रदीप च्या मागे आई वडील बहीण असे त्याचे परिवार आहे.
0 Comments