या केंद्रामध्ये पुरुष व महिला तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
कोरोनामुळे रुग्णांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी तसेच समुपदेशनासाठी मानसिक आधारची सर्वात मोठी गरज आहे
यासाठी रुग्णांना प्रशिक्षित डॉक्टरामार्फत योगा, प्राणायाम तसेच आरोग्य उपयोगी दैनंदिन व्यायामाची व्यवस्था
या केंद्रामध्ये रुग्णांची राहण्याची तसेच चहानाष्टा व जेवणाची सोय पूर्णपणे निःशुल्क (मोफत) असेल. याचबरोबर या केंद्रामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरस् यांची टीम व रुग्णांची देखभाल करण्यासाठी अनुभवी परिचारिकांचा समावेश आहे.
कोरोना अलगीकरण केंद्राचे ओपनिंग करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, शहराध्यक्ष अविनाश तशिलदार, उपशहर अध्यक्ष अतिश पाटील, उपशहर प्रमुख संदीप कुरबेटी, उपशहर अध्यक्ष सैराज सुभेदार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अमित पाटील, विजय देसाई
उपस्थित होते.
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments