उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील भोत्रा गावमध्ये ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीच्या वतीने गोडगे वस्ती, घुलेवस्ती, कोळी वस्ती, गोफणे वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरोना विषाणू प्रादर्भाव रोखण्यासाठी ७५ लोकांची रॅपिट अंटीजन टेस्ट करण्यात आल्या.
यामध्ये दोन जनांचे रिपोर्ट पोझिटीव्ह आले आहेत तसेच सर्वांना मास्क वापरा कोरोनाची लस घ्या तसेच वारंवार हात स्वच्छ धुवा असे मार्गदर्शन करण्यात आले
डॉ मुस्ताक हसन मुल्ला यांचे विशेष सहकार्य लाभले, गावातील सरपंच गोफणे, उपसरपंच विठ्ठल शिंदे, ग्रामसेवक सातपुते मॅडम, पोलिस पाटील, तलाठी कांबळे साहेब, राजकुमार देशमुख, ग्रां प सदस्य, डॉ अमोल गोफणे, अमोल गोडगे ग्रा प सदस्य, कोरोना दक्षता समिती संपर्क अधिकारी अंकुश जाधव, अरविंद गोडगे, आबा गोडगे तसेच अंगणवाडी अशा कार्यकर्ती शिंदे मॅडम तसेच जि.प. प्रा शाळा सर्व शिक्षक उपस्थित होते..
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments