संगमनेर शहरातील नागरिकांना घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात व्हॅक्सिन घेण्याकरता जावा लागते
ते शहरापासून ७ ते ८ कि मी अंतर कापून नागरीकांना ग्रामीण रुग्णालयात जावा लागते हे नागरिकांना परवडणारे नसून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होते!
घुलेवाङी ग्रामीण रूग्णालयात सध्या कोरोना सेंटर पण आहे व व्हॅक्सिन केंद्र पण आहे यामुळे घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
व्हॅक्सिन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रूग्णालयात नंबरसाठी रांग करावी लागते! जर गर्दी अभावी नंबर लागला नाही तर नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात!हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही!जिव ठेवून नागरिकांना घराबाहेर पङावे लागते!संगमनेर शहरातील नागरीकांचा महत्वाचा प्रश्न असलेल्या व्हॅक्सिन केंद्राबाबत विक्रमसिंह खताळ पाटील दादांनी जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले साहेबांनी स्वाक्षरी केली आहे
जिल्हाधीकारी राजेन्द्र भोसले म्हणाले की ही मागणी योग्य आहे लवकरात लवकर आपली मागणी पुर्ण होईल.
त्यामुळे लवकरच संगमनेर नगरपालिका कॉटेज रूग्णालयात को व्हॅक्सिन केंद्राला मान्यता मिळण्याची नागरिकांमध्ये आशा आहे..
संगमनेर प्रतिनिधी : अमोल शेळके
0 Comments