यवतमाळ : झरी जामणी कोवीड १९ च्या महामारीत रुग्णांना सर्व सुविधा देण्यास प्रशासन अपुरे पडत आहे अशा संक्रमण अवस्थेत आरोग्य सुविधेसाठी दातृत्व समाजात समोर येत आहे.
झरी जामणी आदिवासी दुर्गम भागात कार्यकरणार्या शिक्षकांनी सामाजिक दातृत्वाचा परिचय दिला आहे.
सामाजिक ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्नालय झरी कोवीड१९ सेंटरला सर्व सुविधा उपलब्ध नाही.म्हणुन जि प खाजगी शिक्षकांनी सामाजिक बांधीलकी म्हणुन २,००,००० लाख वर्गणी जमा करुन तीन ऑक्सीजन क्राॅन्सट्रेटर यंत्र भेट दिले.
तहसिलदार झरी जोशी, भगवत रिज्जेवाड (गट विकास अधिकारी झरी, प्रकाश नगराळे ग.शि.अ.झरीयांचे उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मोहन गेडाम यांना सुपुर्द करण्यात आले.
ऑक्सीजन काॅन्सट्रेट यंत्र हे कोरियातुन आयात केले असुन हे यंत्र २४ तास कार्यरत असणारे यंत्र आहे.
प्रत्यक्ष एकाच वेळी तीन रुग्नाना ऑक्सीजनची निर्मिती करुन पुरवठा करण्यात येणारे अत्याधुनिक संयंत्र आहे.
यासाठी दुर्गम भागातील काम करणार्या शिक्षकांनी जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
असे मत जोशी तहसिलदार यांनी मनोगत व्यक्त केले.
सोबत कोविड योद्धा म्हणुन झरीत सेवा करणारे डाॅक्टर व परिचारिका यांचे शाल-श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले साठी म.रा.शिक्षक समितिचे अध्यक्ष संतोष मेश्राम, अरविंद गांगुलवार, प्रवीण शहारे, विठ्ठल उईके, रमेश सातपुते, श्रीकांत राउत, मनोज एल्टीवार, सुनिल वाटेकर, संजय आगुलवार, रंजन कडु, दत्तु कसरेवार ईत्यादी शिक्षकांनी मेहनत घेतली असुन शिक्षक मंडळीच्या या प्रेरणादायी कार्याला सर्व स्तरातुन कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी यांनी न्यूज ब्यूरो चीफ यांना दिली. ...
0 Comments