गडहिंग्लज : दि २१/०५/२०२१ रोजी गडहिंग्लज येथे मा. राजसाहेब ठाकरे कोविड अलगीकरण आरोग्य केंद्र उद्घाटन करण्यात आले..
डॉ मा वसंत पेडणेकर, डॉ एम एस बेळगुद्रि, डॉ.मा. नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ.मा. सचिन पाटील, डॉ.मा. अमर पेडणेकर, डॉ.मा. अरुणा तोडकर, डॉ.मा. शुभांगी निकम, मा. स्वाती नागेश चौगुले, शहर अध्यक्षा मा. प्राजक्ता पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून मा. राजसाहेब ठाकरे कोविड अलगीकरण आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष मा.नागेश चौगुले यांच्या कडे ५०० अंडी मा. तानाजी मुसळे, दिगंबर मुसळे, दिपक मुसळे यांनी सुपूर्त केले व रोज सकाळी चहा नाष्टा देणार असल्याचे सांगितले...
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments