महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन होत असून आता महिलांच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठीही उमेद अभियान खंबीरपणे पाठीशी उभा राहत असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती परंडा च्या सभापती अनुजा सतीश दैन यांनी केले...
उन्नती महिला उमेद ग्राम संघ शेळगाव तालुका परांडा यांनी सुरू केलेल्या घरकुल मार्ट चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
घरकुल मार्ट च्या माध्यमातून घर बांधणाऱ्या कुटुंबांना आता गावपातळीवरच घराला लागणारे विविध प्रकारचे साहित्य घरकुल मार्ट च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
तसेच या माध्यमातून बचत ही होणार आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घरकुल मार्ट ची स्थापना करण्यात येत असून या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून घर बांधण्याची इच्छुक असणाऱ्या कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री महेंद्र कदम यांनी उमेद च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गटांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँक ही नेहमी सोबत राहणार आहे असे सांगितले.
उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या ग्रामसंघ व प्रभाग संघांना संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायत शेळगाव मार्फत करण्यात येत असल्याचे सरपंच श्री विष्णू नाना शेवाळे यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच श्री विष्णू नाना शेवाळे, उमेद चे तालुका व्यवस्थापक मुकेश लक्षे, माणिक सोनटक्के, धनंजय चांदणे व ग्रामसंघ पदाधिकारी आणि संसाधन व्यक्ती उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड व प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात उमेद अंतर्गत महा समृद्धी अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे...
0 Comments