कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग तोडण्यासाठी आज (शनिवारी) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तीन शिफ्टमध्ये साडेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे. जिह्याच्या सीमांवर 19 ठिकाणी चेकनाके उभे करण्यात आले आहेत. तसेच, सतत गस्त सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली.
कोल्हापूर जिह्यात व शहरात प्रवेश करणाऱया सर्व ठिकाणी आणि सर्व चौकांत तपासणीनाके उभे केले आहेत. परजिह्यांतून कोल्हापुरात येणाऱया पासधारकांनाच जिह्यात प्रवेश दिला जाणार आहे.
असा असणार बंदोबस्त
अपर पोलीस अधीक्षक -2
पोलीस उपअधीक्षक - 6
पोलीस निरीक्षक -25
एपीआय, पीएसआय - 25
पोलीस कर्मचारी - 2200
होमगार्ड जवान - 1100
प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments