गडहिंग्लज : शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या कोविड काळजी केंद्राला नगरपालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या केंद्रासाठी ५ लाखांची ऑक्सिजन मशिनरी स्व:खर्चाने दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष महेश कोरी यांचे सत्ताधाऱ्यांसह विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनीही अभिनंदन केले.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेककर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, सौम्य लक्षणे असणाऱ्या व राहत्या घरात अलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांची या केंद्रात काळजी घेतली जाईल. त्यांना मोफत औषधोपचार, जेवण, चहा-नाश्ता, समुपदेशन व मनोरंजन आदी सर्व प्रकारची सुविधा देण्यात येतील..
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
न्यूज 24 खबर
0 Comments