अमोल शेळके यांचे अर्ज स्विकारण्यास नकार देत त्यांनी बातमी पेपरवाले यांना दिल्याने ग्रामसेवक यांनी अमोल शेळके यांच्या वर राग काढत त्यांच्या तोंडात थापड मारली. या विरोधात शेळके यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाई करण्यात यावी असे म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी गावच्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल आश्वी बुद्रुक संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी गावचे रहिवाशी अमोल शेळके या व्यक्तीकडे गावातील काही महिलांनी गावात पाणी येत नसल्या कारणाने आपल्या सह्या करून अमोल शेळके यांच्या कडे अर्ज दिला होता. शेळके अर्ज घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेले असता त्यांच्या अर्जाला कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. या कारणावरून त्यांनी विविध पत्रकार मित्रांना या संदर्भात बातमी दिली बातमी छापून आल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पाण्या संदर्भात इतर अडचणीची विचारपूस करण्यासाठी गेलो असता हंगेवाडीचे धराडे ग्रामसेवक माझी बातमी का लावली बोलत या रागाने अमोल शेळके यांच्या तोंडात मारले व मोबाईल हिसकावून दम देत धक्का बुक्की केली. सदर घडलेल्या प्रकरणाचा गुन्हा शेळके यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
0 Comments