यवतमाळ : सत्यपाल महाराज हे मागील पन्नास वर्षापासून लोकांना अंधश्रद्धा व्यसनमुक्ती स्वच्छता ग्रामसुधारणाचे
मंत्र देऊन जन जागृत करत आहेत
त्यांच्या 65 व्या वाढदिवसा निमित्त माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना फळे व जेवण वाटप करण्यात आले.
माणुसकीची भिंत चे सदस्य हे मागील सहा वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळेचे जेवण पुसद वाशी यांच्या सहकार्यातून मोफत देण्यात येत आहे.
त्यासोबत मास सॅनिटायझर रुग्णांना आर्थिक मदत मार्गदर्शन तसेच पुसद मधील गरजूंना माणुसकीची अन्नदान किट कपडे आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते
आज सत्यपाल महाराज यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे पंकज पाल महाराज, चंद्रकांत वाघमारे, निरंजन राठोड, संतोष माने, गजानन जाधव, जगत रावल, संतोष गावंडे, अमोल मोरे, सुधीर निळकंठे, दीपक घाडगे, अमोल व्हडगीर आदी उपस्थित होते..
यवतमाळ प्रतिनिधी : नितिन मानवर
0 Comments