परंडा : तुळजाभवानी मच्छीमारी संस्थेची बदनामी करण्या साठीच विषबाधा केल्याचे कट रचुन खोटे आरोप तालुक्यातील डोमगाव ग्राम पंचायतच्या वतीने करण्यात आले असुन पाणी नमुना तपासणी अहवाल आल्यावर सत्य समोर येईल असे संस्थेचे चेअरमन बालाजी सल्ले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सिना - कोळेगाव धरणातील मासे मुत्यु झाल्याची घटना घडल्या नंतर परंडा तालूक्यातील डोमगाव येथील ग्राम पंचायतच्या वतीने दिनांक १७ मे रोजी तुळजाभवानी मच्छीमारी सहकारी संस्थेच्या विरोधात सीना-कोळेगाव धरणातील पाण्यात विषबाधा केल्याचे आरोप केले होते.
हे आरोप संस्थेचे चेअरमन सल्ले यांनी फेटाळून लावले, ग्राम पंचायत ने ठेक्याची मुदत संपल्याने शासकीय योजनांचा लाभ व विम्याची रक्कम उचलण्यासाठी विषबाधा केल्याचा बालीश पणाचा खोटा आरोप केला मात्र आरोप करण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय ठेका कधी मिळाला आहे.
याचीही माहिती घेतली नाही वरील सर्व बाबी ची सत्यता पडताळून न पाहता जनतेमध्ये गैरसमज पसरण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न केले आहे.
तुळजाभवानी मत्स्य व्यवसाय संस्थेला दिनांक १ जुलै २०२० वीस ते ३० जून २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ठेका मंजूर झालेला आहे.तसेच मच्छिमारी व्यवसाय साठी विमा उचलण्याची कोणतीही तरतूद नसताना खोटे आरोप केले आहे.
संस्थेने सीना-कोळेगाव धरणात जानेवारी महिन्यात १३ लाख ३४ हजार रुपये किमतीचे मत्स्यबीज सोडले आहे.
गेल्या तीन चार दिवसा पुर्वी मासे मृत्युमुखी पडल्याने संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मासे मृत्युमुखी पडण्याचे कारण काय आहे.याचे कारण शोधन्या साठी पाण्याचे नमुने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद , मुंबई, प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविले आहेत.
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments