भोकरदन - नुतन कॉलनी येथे नगर पालिका कर्मचारी यांनी नळासाठी खड्डे खोदले होते खड्डे खोदून ते खड्डे पूर्ण न बुझवता काम अर्धवट ठेऊन नगर परिषद भोकरदन कर्मचारी पळून गेले. ज्यामुळे परी साळवे या लहान चिमुकली ला खेळतांना भरधाव वेगाने कार जात असतांनी खड्ड्यात ती कार अडकली ज्यामुळे कारचे चाक हे खड्ड्यात फसले व परी साळवे (वय 5 वर्षे) या चिमुकली ला त्या खड्ड्यातला दगड कपाळावर लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे.
भोकरदन नगर परिषद आणि नगरसेवक व कर्मचारी जनतेच्या जीवावर बसले आहे असे समजून येते..
जनता अशा लोकांना धडा शिकवणार असे गल्लीतील नागरींकांनी सांगितले.
भोकरदन प्रतिनिधी न्यूज ब्यूरो चीफ
0 Comments