खरिप पेरणी पूर्वी चालू व थकीत शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करणे व गतवर्षीचा पीक वीमा त्वरित जमा करणे या विषयाचे निवेदन मागणी करण्यात आली.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल नुकसान, अवेळी किचकट ऑनलाईन भरण्याची अट घातल्याने खरीपाचा वीमा अजून जमा झालेला नाही.
पेरणी अगदी तोंडावर आलेली, रासायनिक खताचे भाव वाढवून अगोदरच केंद्र व राज्य शासनाने शेतकरींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
कोरोनामुळे अगोदरच शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यातच शेतकरी व नागरिकांना दररोज उपजीविका भागवणे यावरून कोरोना काळात कठीण झालेले आहे. त्यामध्ये ही लाॅकडाऊन मागे लाॅकडाऊन शासनाने लावले त्यामुळे छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत, पेरणी अगदी तोंडावर आली आहे
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली त्यामुळे आमच्या हक्काचा २०२० चा खरिपाचा पीक वीमा त्वरित जमा करावा ही नम्र विनंती.. त्यातच बॅंक अधिकाऱ्यांनी एजंट नेमलेले आहेत, त्यांच्या मार्फत जी फाईल येईल ती पास होते अथवा वर्ष वर्ष हेलपाटे मारावे लागतात, स्टॅम्पचा कालावधी संपून दुसरा स्टॅम्प आणावा लागतो, परत कागदपत्रे जमा करा ह्या शेतकऱ्यांचा वेळ तर जातोच त्याचबरोबर खर्च व वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागतो अशा तक्रारदारांची संख्या भरपूर आहे तेव्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे.
सरकारने चालू व थकबाकीदार दोन्ही शेतकऱ्यांना ही दयनीय अवस्था पाहता तेव्हा सर्व बँक पहीले दूसरे व्यवहार बंद करून तात्काळ कसल्याही किचकट अटी न घालता पीककर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना द्यावे ही नम्र विनंती.
आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही खालीलप्रमाणे गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन सुरू ठेवणार आहोत..
उद्या पासून पीकविम्यासाठी तहसिलदार साहेबांना निवेदन द्यायला जाणार ...
१ ला दिवस - संपूर्ण कपड्यावर जाणार...
२ रा दिवस - पॅन्ट घालून बनियन वर जाणार...
३ रा दिवस - पॅन्टवर बनियन काढून जाणार...
४ था दिवस - पॅन्ट काढून चड्डीवर...
५ वा दिवस - चड्डी काढून नागव निवेदन द्यायला जाणार..
मग गेल्यावर्षीचा खरिपाचा पीकविमा देणार का शेतकऱ्यांना नागव करणार हे विमा कंपनी, प्रशासन व शासनाने ठरवावे.
जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत दररोज एका कपड्याचा त्याग करून निवेदन द्यायला जाणार ...
0 Comments