कोल्हापूर : शहरात कडक आणि नियोजनबध्द लॉकडाऊनमुळे निरीव शांतता अनुभवायला मिळाली..
पक्षांचा किलबिलाट, कोकिळेचा मधूर आवाज तर अधुन-मधून केवळ रुग्णवाहिकेच्या आवाजा व्यतिरिक्त शहरातील प्रत्येक गल्ली आणि चौक आज लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी चिडिचूप राहिला.
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 पासून ते रविवारी (23) दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने केलेले नियोजनासह प्रत्यक्ष रस्त्यावर भर पावसात उभे राहून पहारा देणाऱ्या पोलिसांमुळे लॉकडाऊनचा पहिला दिवस शंभर टक्के यशस्वी झाला आहे.
शहरात विनाकारण कोणीही फिरू नये यासाठी फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, तावडे हॉटेल, कसबा बावडा, शिवाजी पुल तसेच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाटेवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments