खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ठाकरे यांचे कोरोना ने निधन

यवतमाळ : पुसद तालुका येथील गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर एन ठाकरे कोरोनाशी दीर्घ संघर्षा नंतर आज रोजी दिनांक 18 मे 2021 रोजी सकाळी 4 च्या सुमारास निधन झाले.
मागील दोन महिन्यात कोरोना बाधित होण्याची त्यांची ही दुसरी वेळ होती, पहिल्या वेळस बाधित झाल्यानंतर जवळपास 14 दिवसांच्या उपचारा नंतर ते बरे झाले , नंतर त्यांनी पदभार सुद्धा सांभाळला होता, मात्र पुन्हा एप्रिल च्या शेवटी कोरोना बाधित झाले, जवळपास मागील 18 दिवसापासून ते हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते यादम्यान दि. 10 मे रोजी त्यांना हार्ट अटॅक आला, या मध्येच त्यांची प्रकृती चिंताजनक बनली.
डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर ही यावेळी मात्र डॉ ठाकरे  कोरोनावर मात करु शकले नाहीत.
शेवटी एक झुंझार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड झाले असे ठाकरे यांच्या मित्र परिवारातील लोकांनी न्यूज 24 खबर यवतमाळ प्रतिनिधी नितीन मानवर यांना सांगितले..
यवतमाळ प्रतिनिधी : नितीन मानवर  

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools