कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या नाभीक आणि रिक्षाचालकांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सहकार्याने उद्योजक पंकज पाटील आणि बाबासो कोंडेकर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक आणि सभासदांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून शीधा वाटप करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून लाँकडॉऊनमुळे रिक्षाचालक आणि नाभिकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती अजूनही तशीच असून सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा या बिकट परिस्थितीत माणुसकीच्या नात्यातून ६० नाभिक आणि ६० रिक्षाचालकांना ही मदत करण्यात आली.
याप्रसंगी बाबासो कोंडेकर, पंकज पाटील, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष झेंडे, रमेश चावरे, राहुल काशीद, प्रशांत मोरे, मिलिंद सार्दळ आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments