भोकरदन : जामिनासाठी सातबारा दिला नाही म्हणून बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण केल्याचा प्रकार भोकरदन शहरात घडली विलास लक्ष्मण शेवाळे असे फिर्यादी चे नाव आहे.
काय आहे प्रकरण पाहू या
दिनांक 29 एप्रिल रोजी विलास शेवाळे शेतात नांगरणी करीत असताना दुपारी 1 वाजता संतोष सुकलाल वाघ, बाबासाहेब पगारे, गोटूबा भागाची तळेकर ( सर्व रा.भोकरदन ) या तिघांनी संगनमत करुन विलास शेवाळे यांना पांढऱ्या डस्टर गाडीत पिशोर (ता.सिल्लोड) येथे पोलिस ठाण्यात कामासाठी चल म्हणून गाडीत बसवले.
परंतु विलास यांने नकार दिला संतोष हा गल्लीतच राहत असल्याने त्याची ओळख होती.त्यामुळे विलाससह चौघे जण गाडीत बसून पिशोरला निघून गेले.काम आटोपल्यानंतर संतोष वाघ याने एका दुकानातून दारू विकत घेतली व गाडीत आणून ठेवली काही अंतर पुढे गेल्यावर विलास शेवाळे यांना बळजबरीने दारू पाजली.
यावेळी मागील एका प्रकरणात संतोष वाघ याने जामिनासाठी सातबारा मागितला होता त्यावेळी विलास शेवाळे याने सातबारा देण्यास नकार दिला होता याचा राग मनात ठेवून दोघांमध्ये वाद सुरू झाला.वादात वाघ याने शिवीगाळ करत शेवाळे याला डोळ्यावर , गळादाबुन मारहाण केली.सोबत असलेल्या दोघांनी विलास शेवाळे यांना धरून ठेवले व बेदम मारहाण केली यात तो बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी अजानचा आवाज कानावर पडल्याने तो शुद्धीवर आला.भोकरदन रोड वर जखमी अवस्थेत पडलेला असल्याचे लक्षात आले.घटनास्थळी त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम गायब झाले समजले.
उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून या प्रकरणी विलास शेवाळे यांच्या फिर्यादी वरून वरील तिघांविरुद्ध भांदवि 307,327,328,323,324,504,34 कलमानव्ये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि आर.के.तळवी करीत आहे..
न्यूज ब्यूरो चीफ - भोकरदन प्रतिनिधी
0 Comments