यवतमाळ : झरी जामनी येथे क्षुल्लक घरगुती वादातून दारू पिऊन आलेल्या जन्मदात्या वडिलाच्या छातीत धारधार सूरा भोसकून मुलाने पित्याचा निर्घृण खून केला
काय आहे प्रकरण
मुकूटबन पोलीस स्टेशन हद्दीतील भेडाळा गावात धक्कादायक आणि क्रूर घटना घडली या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
नथु आसुटकर ( वय 50 ) असे खून झालेल्या वडिलाचे नाव असून वैभव आसुटकर ( वय 19 ) असे खून केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे..
सविस्तर वृत्त या प्रमाणे की मृतक वडील नथु आसुटकर याला दारू पिण्याची सवय होती. तो घरी आल्यावर नेहमी सायंकाळी पत्नी आणि मुलासोबत लहान सहान गोष्टीवरून वाद करायचा .
मात्र १९ मे च्या सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान नेहमी प्रमाणे मृतक नथु आसुटकर दारू पिऊन घरी आला, घरी आल्यानंतर पत्नी आणि मुलगा वैभव यांच्या सोबत नथु आसुटकर यांचा घरगुती शुल्लक कारणावरून वाद झाला..
त्या वादात मुलगा वैभवला राग अनावर न झाल्याने मुलाने घरी असलेला सुऱ्याने वडिलांच्या छातीमध्ये सुरा भोसकला त्यामध्ये वडील खाली कोसळले, वाद आणि ओरडण्याचा आवाज आल्याने आसपास जवळील नागरिकांनी आसुटकर यांच्या घराकडे धाव घेतली, जखमी झालेल्या नथु आसुटकर यांना नागरिकाने क्रूझर गाडीमध्ये वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले...
आरोपी मुलगा वैभव नथु आसुटकर (वय १९) याच्यावर भांदवी 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मुकुटबन पोलीस निरीक्षक सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक युवराज राठोड व जमादार जितेश पानघाटे करीत आहे.
काल सकाळी १० वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी सुद्धा भेडाळा गावात जाऊन घटनास्थळी भेट दिली..
यवतमाळ प्रतिनिधी : नितिन मानवर
0 Comments