माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात जास्ती जास्त प्रमाणात टेस्ट करावे याकरिता सर्व नियंत्रण अधिकारी व कर्मचारी यांनी गृहभेटी देऊन टेस्ट करून घेण्यास नागरिकांना प्रवृत्त करावे प्रशासनाच्या आदेशाची तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे
त्यानिमित्त रॅपिड चाचणी चे नियोजन केले होते यावेळी या तपासणी 78 पैकी 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेया रॅपिड टेस्ट तपासणी वेळी माननीय तहसीलदार हेळकर साहेब व वैद्यकीय अधिकारी सय्यद साहेब यांनी अचानक भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले
उपस्थित नागरिकांना माननीय तहसीलदार साहेब यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कोरोना विषयी नियमांचे पालन आपण सर्वांनी काळजी पूर्वक करावे मास्क वापरा वारंवार हात धुवा सॅनिटायझर वापरा .
कोवीड संपर्कातील लोकांनी टेस्ट करून घ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी विषय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रशासनाला सहकार्य करावे तपासणीत किट कमी पडू देणार नाही परंतु गाव कोरोना मुक्ती कडे घेऊन जाण्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे समितीने गावात नियमांची कडक अंमलबजावणी करावी ..
यावेळी सरपंच नितीन घाडगे बाळू कोळेकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर मुल्ला साहेब, संपर्क अधिकारी जाधव अंकुशराव, ग्रामसेवक देवकते उल्हास, तलाठी विशाल खळदकर, एन एम कोकणे मॅडम, आशाताई यादव मनीषा , यादव वर्षाराणी, अंगणवाडी लता गिलबिले, अश्विनी देशमुख, मदतनिस समसाद शेख, सेवक शिंदे इत्यादींची उपस्थिती होती...
0 Comments