यवतमाळ : झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन व आसपास परिसरात मोठं मोठे सिमेंट उधोग, कोळसा खंदान, गिट्टी खदान असून सुद्धा स्थानिक युवक व प्रकल्पग्रस्त गावातील युवक बेरोजगारीच्या विखळ्यात आहे.
यामुळे नाइलाजास्तव व्यसनाधीन होऊन पदवीधर युवक सध्या दारू विक्री, रेती तस्करी तसेच डिझेल चोरी हे काम छुप्या पद्धतीने करीत आहे.
झरी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पदवीधर, इंजिनिअर, तसेच आय.टी.आय झालेली शेकडो युवक आहे.
लाखो रुपये खर्च करून अनेक युवकांनी आपले पदवीधर शिक्षण मोठं मोठ्या शहरात राहून पूर्ण केले .
आपल्या परिसरात मोठं मोठे उधोग असून सुद्धा शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देत नसल्यामुळे अनेक युवक हताश झाले आहे. तालुक्यात असलेल्या काही कँपन्यांनी स्थानिकांना रोजगार संबधित विषय बाजूला ठेवून इतर राज्यातील लोकांना रोजगार दिला जात आहे.
स्थानिकाना ८०% रोजगार द्या , स्थानिक अकुशल लोकांना कुशल करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारा, सीएसआर निधी प्रकल्पग्रस्त गावावर खर्च करा. असे शासनाचे आदेश असताना सुद्धा तालुक्यातील काही कंपनी व्यवस्थापक, संचालक याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी बेरोजगार युवकांच्या रोजगारांचा विषय सुद्धा लावून धरत नाही. निवणूक आली की रोजगाराचा विषय चर्चिला जातो.असे चित्र सद्या तालुक्यात दिसत आहे. तालुक्यातील युवक हताश होऊन आपले कुटुंब चालवण्यासाठी पदवीधर पदवी बाजूला ठेवून अवैध मार्गाला जात आहे. अनेक तरुण हे दारू, गुटखा, गांज्या च्या व्यसनाधीन झाले आहे.
तालुक्यातील काही मोठं मोठे प्रतिष्ठित लोक अवैध दारू विक्री, गुटखा, रेती तस्करी करतात मात्र त्यांना पोलीस पाठीशी घालत आहे.मात्र काही युवक आपले कुटुंब चालवण्यासाठी दारू विक्री करतात त्यांच्यावर तात्काळ कारवाही होते.असे चित्र सद्या मुकुटबन परिसरात दिसत आहे.
बरोजगार युवकांच्या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधीनी व जिल्हाप्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी बेरोजगार युवकातून होत आहे.
यवतमाळ प्रतिनिधी : नितीन मानवर
0 Comments