अहमदनगर : भिम गर्जना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी कुमारी तितिक्षाताई चितळे यांची निवड भिम गर्जना चे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या आदेशावरून करण्यात आली..
मुंबई गोरेगाव येथील कंप्यूटर इंजिनियर व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ती कु.तितिक्षा चितळे हि सामाजिक शैक्षणिक कामात अग्रेसर असते, गोरगरीब जनतेची सेवा व मदत करणे या सर्व कामाला बघून संघटनेचे राज्य सचिव पदी यांची निवड करण्यात आली आहे असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले .
निवडीबद्दल महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्ष तमन्नाताई पवार,
संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवा भाऊ साठे, संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अनिल मास्टर कांबळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख इम्रान शेख, महासचिव गोविंद रोडे, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण साळवे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे..
ब्यूरो चीफ न्यूज 24 खबर
0 Comments