यवतमाळ : झरी जामनी तालुक्यात मुकूटबन ग्रामपंचायत आरोग्य केंद्र सहकार्याने Covid-19, RT-PCR टेस्ट कॅम्पचे आयोजन जि.प.प्रा.शाळा मुकुटबन येथे करण्यात आले होते.
कॅम्प मध्ये 48 RT-PCR टेस्ट व 33 रॅपिड अंटीझन टेस्ट अशा 81 टेस्ट करण्यात आल्या, गावकर्यांनी टेस्टिंग कॅम्पला प्रचंड प्रतिसाद दिला.
कॅम्प यशस्वी करण्यासाठी कर्तव्य तत्पर सरपंच - सौ मिना आरमुरवार, उपसरपंच- श्री.अनिल कुंटावर, पोलिस पाटील श्री. दीपक बरशेट्टीवार , ग्रा वि अ जाधव, तलाठी राणे, आशा वर्कर, राधा लिक्केवार, शोभा गडेवार, शोभा मेश्राम, कोतवाल लल्ला कांबळे व ग्राम पंचायत कर्मचारी संजय पारशिवें, राकेश निम्मंलवार, श्रीनिवास संदर्लावार व गावकर्यांनी सहकार्य केले.
तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. मोहन गेडाम व मुकुटबन आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले...
यवतमाळ प्रतिनिधी : नितिन मानवर
0 Comments