कोल्हापुर : कोल्हापुरात उद्या मूक आंदोलन होणार आहे. याचे नेतृत्व खासदार संभाजीराजे करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराजांच्या समाधीस्थळी नर्सरी बागेत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची बैठक झाली.
उद्यापासून होणाऱ्या मूक आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे कोल्हापुरात पोहचले आहेत.
उद्या शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं. आंदोलनाची सुरुवात करण्याचा मान कोल्हापूरला मिळाला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करायचं आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी कोणालाही उलट सुलट बोलू नये असंही आवाहन संभाजी राजेंनी केलं. शाहु महाराजांच्या समाधीस्थळी त्यांनी मूक आंदोलनाची हाक दिली.
याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन कधी आणि कसे होणार हे सांगितले होते. 16 जूनला दहा ते एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार असून, आंदोलनाच्या परिसरात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, विद्यार्थी असणार आहेत.
त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी सन्मानपूर्वक येऊन भूमिका मांडावी, असेही त्यांनी सांगितले होते..
0 Comments