राहुरी : तालुक्यातील चिंचविहीरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या. स्वामीनगर वसाहतीतील नागरिकांना,गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागेले आहे
याठिकाणी गेल्या २० वीस वर्षापासुन येथील नागरिकांना, दळण- वळणासह लहानमुलांच्या शाळेत ,तसेच वयोवृद्ध व आजारी नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी रस्त्याची सोया नाही, यासंदर्भात वारंवार तक्रार केल्याने, याची दखल घेऊन काही शेतकऱ्याच्या आपल्या बांधावरून, येण्या-जाण्याकरीता रस्ता दिला होता.
परंतु तो कायम स्वरूपी नसल्याने, संबंधीत शेतकरी शेताची मशागतिचे काम सुरू असल्याने. बांधावरील रस्त्यांची पुन्हा बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सदर रस्त्या प्रमाणेच स्वामीनगर रहिवाशी यांची पिण्याच्या पाण्यासाठी आजही वणवण चालू असून. पाण्या करिता सुरू असलेली भटकंती थांबवावी, याकरिता १४ जुलै २०१६ रोजी परिसरातील नागरीकांनी, ग्रामसेवक, सरपंच, तंटामुक्टी अध्यक्ष, पोलिस पाटील, तलाठी साहेब यांना निवेदन दिलेले होते.
परंतु गेल्या ५ वर्षात नागरिकांच्या समस्या मार्गी न लागल्याने, नागरिकांच्या समस्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने, राहुरी तहसीलदार , गटविकास अधिकारी, तसेच चिंचविहीरे ग्रामपंचायतीस निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमीचे जिल्हा दिनेश जाधव, देविदास कोथळे, संजय शिंदे, रेखा कोठुळे,निर्मला शिंदे,सारिका जाधव, आदिक, काळपुडे, कुठे आदींसह स्वामीनगर येथील नागरिक उपस्थितीत होते.
0 Comments