गडहिंग्लज : मुगळी ३ दुपारी वादळी पावसाने कोंबडी पोल्ट्री शेडची भिंत पडून नागनुर ३ जणांचे जागीच मृत्यू परिसरात हळहळ..
त्यामधे एक पुरुष व व दोन महिला याच समावेश आहे.
या बाबतची माहिती अशी की
अजित अर्जुन कांबळे वय 40, संगीता बसवराज कांबळे 42, गिरीजा संदीप कांबळे 38, सर्व नांगणुर गावचे रहवाशी असून हे सर्व मोलमजुरी साठी सकाळी सुमारे ९ च्या सुमारास हरळी ह्या ठिकाणी कामावर गेले होते, काम संपवून घरी परतत असताना मुगळी येथे अचानक वादळी वारा व पाऊस सुरू झाले, कारणाने आजूबाजूला आडोसा नव्हता त्या ठिकाणी भीमा शंकर माने याच्या पोल्ट्री फॉर्म च्या भिंती ला आडोसा घेऊन तिघे उभे असता अचानक सिमेंट विटेचे भिंत त्या तिघांवर कोसळून जागीच मृत्यू झाला,
गिरीजा याचे पती गेल्या वर्षीच जून मध्ये मृत्यू झाला आहे आणि गिरीजा याच्या घटनेने त्याचे दोन मुले आई वडील विना पोरकं झाले आहेत.
व संगीता कांबळे याचे पती बसवराज कांबळे याना गेल्या वर्षी लकवा(पॅरलेस) मारल्या कारणाने घरचे सर्व जबाबदारी संगीता निभावत होते त्यांना ६ लहान मुली असून ते देखील आता आई विना पोरकी झाले आहेत
आणि त्या दोन्ही कुटूंबाचे उदरनिर्वाह प्रश्न गंभीर झाले आहेत.
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments