मुस्लिम बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी तर्फे भव्य असा जयंती महोत्सव घेण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप जी ताजणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान बहुजन समाज पार्टीने कसा केला आहे याची विस्तृत माहिती प्रदेशाध्यक्ष ताजणेजी यांनी दिली .
आरक्षणाचे जनक असणाऱ्या महापुरुषांच्या वारसानाच आज आरक्षण मागण्याची वेळ आली आहे
कालेलकर आयोगाच्या वेळी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओबीसींच्या ओबीसींच्या सन्मानाच्या आरक्षणाच्या या बिलाला केराची टोपली दाखवली 2012 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती यांनी राज्यसभेमध्ये पदोन्नती बिल पास केले असताना याच आरक्षणाला तत्कालीन काँग्रेस आणि भाजप या दोघांनी संगनमताने विरोध केला. महागाई बेरोजगारी आणि आरक्षण या तिन्ही विषयात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघही सपशेल फेल झाले आहेत.
आरक्षणावर सकारात्मक बोलण्याचा अधिकार कॉंग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादि यांना नाही कारण यांच्या पुर्वजांचा आरकक्षणाबाबतीतला इतिहास लाजीरवाणा आहे सर्वसामान्य बहुजन बांधवा पैकी ओबीसी बांधव यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांचे आरक्षण संपवण्याचे पाप या सत्ताधारी व विरोधक यांचे आहे.
समाजानं सावध होऊन परम आदरणीय बहन मायावती यांचे नेतृत्व स्वीकारून यांचे हात बळकट करावे.
याबरोबर येत्या महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था बहुजन समाज पार्टी ताकदीने लढेल असे नमूद केले यावेळी स्वागत जिल्हाध्यक्ष महेश जी कांबळे यांनी केले प्रदेश सचिव शंकर माने जिल्हा झोन प्रभारी उमेश शिंदे , जिल्हा प्रभारी उदय घाटगे, संदीप शिंदे अमर शिंदे ,कोषाध्यक्ष श्रीकांत कांबळे शहराध्यक्ष मारुती कसबे उपस्थित होते सेक्टर ,बूथ, विधानसभा कमिटी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments