खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मदतीचे आवाहन ! मदतीचे आवाहन ! मदतीचे आवाहन !

अत्यंत महत्वाचे
■■■■■■■■■
वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन

🤝====== 🤝 ==== 🤝 ======🤝

पप्पा मामा, मम्मी मावशी, काका मामा, अजून किती वेळ कधी येणार..?
आमच्या पोटाला भाकर अन् कधी बोलणार..?
शाळेला कधी घालणार.?

नांगनूरच्या आठ " चिमुकल्या वंचितांची " समाजातील माणुसकीला आर्त.. हाक.
पॅरालेसिस झालेल्या भावासह त्याची सात मुले आणि पितृछत्र हरपलेल्या दोन भाच्यांच्या कष्टाळू तीन ही आश्रयदात्यांना क्रूर नियतीने हिरावून नेले.... कोरोनाच्या महामारीत वळचनीची भिंतच काळ बनून आली, आणि... आपल्या पोटात त्यांना गडप केली. गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथून कांबळे कुटुंबातील ४ ते १४ वर्षाची ९ चिमुकली गेल्या चार - पाच दिवसांपासून देत असलेल्या आर्त हाकेला शाहूंच्या नगरीत दूत बनून धावून येणे आज खूप गरजेचे आहे.
तशी ही हाक वंचित बहुजन आघाडीच्या कानी येताच जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, कोल्हापूर शहर अध्यक्ष पुडंलिकभाऊ कांबळे, जिल्हा सचिव सुरेश थरकार, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष अर्जुन दुडंगेकर, आदिनी भेट देवून त्या कोवळ्या व कोमल अशा पण " वंचित " जिवांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या थोटक्या प्रयत्नांला बळ देवुन कोल्हापूर जिल्ह्यातील माणुसकीचा आदर्श पुन्हा एकदा जगासमोर ठेवण्यास उदार हात पुढे येणे गरजेचे आहेत..
नांगनूर येथील अजित अर्जुन कांबळे हे विधवा चुलत बहीण गिरीजा आणि पॅरालेसिस झालेल्या भावाची पत्नी संगीता हिला घेवून मुगळी या गावी मजुरीसाठी गेले होते. सायंकाळी काम संपताच आजारी भाऊ, त्याची मुले आणि पितृछत्र हरपलेल्या दोन भाच्याच्या ओढीने कनवटीला कष्टाचे चार पैसे बांधून परततांना या तिघांना वादळी पावसाने अडवले. 

वळचनिसाठी त्यांनी रस्त्यालगत असलेल्या पोल्ट्रीच्या भिंतींचा आधार घेतला.मात्र ही वळचनीची भिंतच काळ बनुन उभी ठाकली व त्यांच्यावर कोसळली. श्वास घेण्यास फुरसतही न मिळालेल्या या श्रमिक त्रिमूर्तींची अक्षरशः दामटी झाली. भिंत कुणाची, थांबविले कुणी, अडचन कोणती, जबाबदार कोण ? असे प्रश्न निरुत्तर नव्हे तर क्षणार्धात गर्भगळीत झाले आहेत.

या प्रामाणिक श्रमिजीविंना रस्त्यातच गाठून पॅरालेसिस आजारग्रस्त बसप्पा कांबळे (४५),सुप्रिया (१५),साक्षी (१३),भूमिका (१२), सृष्टी (९) , अजंली (७) , अर्पिता (४) ,ओकांर (१८), सौरभ (१६ ), या नऊ जिवांना पोरके करण्यात क्रूर नियती यशस्वी झाली .

     अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अगणित संकटाशी दोन हात करुन सामूहिकरीत्या लढण्याची कणखर शक्ती राजर्षी शाहूंच्या या जिल्ह्यातील मातीने इथल्या प्रत्येक माणसाला दिली आहे.... तीच सामुहिक शक्ती वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आवाहनानुसार नव्याने उभी करुन नांगनूरच्या कांबळे कुटुंबातील या चिमुकल्यांचा आधारवड बनण्याची जबाबदारी घेण्यास समाजातील जाणकारांनी पुढे येणे गरजेचे आहे.. 


यासाठी याच कुटुंबातील ओकांर कांबळे खाते क्रमांक ६०२९४८२८४०७ आणि सुप्रिया कांबळे खाते क्रमांक ६०१४२५३९४७५ (दोन्ही खाते बँक ऑफ महाराष्ट्र ) मदतीसाठी वाट पहात आहेत..

ACc No       : 60294828407
ACc No       : 60142539475
IFSC CODE : MAHB0001041

प्रा.विलास कांबळे
जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर.

मा.पुंडलीकभाऊ कांबळे
शहराध्यक्ष
कोल्हापूर शहर

मा.सुरेश थरकार
जिल्हा सचिव

मा.अर्जुन दूदंगेकर
तालुकाध्यक्ष गडहिंग्लज

मा.रवींद्र कांबळे
न्यूज 24 खबर गडहिंग्लज ता.प्रतिनिधी

मा.सुनील कांबळे नांगणुर
वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता

मा.राकेश निडसोशी नांगणुर
वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता

गडहिंग्लज न्यूज 24 खबर प्रतिनिधी : रविंद्र कांबळे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools