भोकरदन : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका खेरडा या गावी जातीयवादी दगडू रामभाऊ आमले या गावगुंडानी जातीयवादी मानसिकतेत महार समाजाच्या भावना दुखावल्या आहे. समाजाला शिव्या दिल्या बद्दल अशा जातीयवादी लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायदा नियम नुसार कडक शिक्षा व्हावी व गावगुंडाना तडीपार करावे या विरोधात भाऊ फाऊंडेशन पँथर्स यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले.
जातीयवादी लोकांना सरकारने कठोर कारवाई करावी तसेच अशा नराधमांना महाराष्ट्रात राहू देऊ नये अशी मागणी भाऊ फाऊंडेशन पँथर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे यांनी केले..
यावेळी शाकेर पहिलवान, पंडितभाई बिरसोने, मुजाहिद खान, साबेरभाई शेख उपस्थित होते.
भोकरदन तालुका प्रतिनिधी : साबेर शेख
0 Comments