औरंगाबाद : मध्यवर्ती कारागृहात निशांत फाऊंडेशन औरंगाबाद याच्या मार्फत "बंदी साक्षर शाळेसाठी" शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात आले.
यात 120 रजिस्टर, 120 पेन , भारतीय संविधान 17 प्रत. बाराखडी चार्ट 4 , ई सामान कारागृह प्रशासनास देण्यात आले.
यावेळी कारागृहाचे अधिक्षक मा.श्री. जयंत नाईक, कारागृहाचे उपाधीक्षक मा. श्री.आर.आर.भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी(प्रभारी) तथा न्यायविभाग प्रमुख मा.श्रीराव मा.काळे यांनी सदरील शैक्षणिक साहित्य हे निशांत फाऊंडेशन औरंगाबाद या संस्थेचे अध्यक्ष मा.वैभव घुले यांनी व त्याचे सहकारी मा.विशाल दाभाडे समाज सेवक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले ..
सदरील साहित्य मिळवून देण्यासाठी धनंजय देशमुख (सहाय्यक आयुक्त विक्री व सेवाकर)मा.योगेश नेतनकर(सहाय्यक आयुक्त विक्री व सेवाकर)मा.अमित आर्यन यांचे मोलाचे सहकार्य लाभले ..
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महादेव डोंगरे व दादासाहेब लहाणे यांनी सहकार्य केले..
न्यूज 24 खबर
औरंगाबाद कार्यकारी संपादक : विशाल पठारे
0 Comments