कळब : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लोकडाऊन जाहीर केला होता त्यामुळे राज्यातील सर्वच बसस्थानके बंद करण्यात आली आहे
त्यामुळे बसस्थानकातील आस्थपनावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे त्यामुळे सर्व काहीं सुरुळीत होई पर्यंत भाडे माफ करावे अशी मागणी कळंबच्या आस्थापना धारकांनी आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्या मार्फत विभागनियंत्रक व परिवहन मंत्री यांच्या कडे केली आहे.
जिल्ह्यामधे बस्थानकावर व्यवसायिकांची दुकानाची संख्या चारशे ते पाचशे आहे लॉकडाऊनमुळे या व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे
त्यामुळे किमान सर्व काही व्यवहार सुरुळीत होईपर्यंत भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी निवेनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर दिलीप चाळक , विलास मुळीक, उमाप, हरिष ध्ममावत, बाब्रुवान शिंदे, सोमनाथ सुरवसे, करीम पठान, आदींच्या सह्या आहेत..
न्यूज 24 खबर
कळंब प्रतिनिधी : अमोल रणदिवे
0 Comments