खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली विरार महानगर पालिकेवर भव्य मोर्चा

विरार : कोविड लसीकरण चालू झाल्यापासून  वारंवार लसीकरण डोस सुरळीत चालू करण्याकरिता भारतीय जनता पार्टी पदाधिकार्यांमार्फत पत्रव्यवहार करण्यात आले होते. 
तसेच यासंदर्भात दिनांक २८ जुन २०२१ रोजी पत्र देऊन मोर्चाचा इशाराही दिला होता, या पार्श्वभूमीवर 16 जुलै रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली विरार महानगर पालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला..
वसईमध्ये सध्या फक्त १२% लसीकरण पूर्ण झालेले आहे तसेच लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकारी यांचे जनते कडे लक्ष नाही लसीकरणाच्या नावाखाली पालिकेचा गोंधळ सुरू असून सामान्य जनतेचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे ?

बहुजन विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी केंद्रा वर हजर राहून सर्वसामान्य जनतेच्या मनात गोंधळ पसरविण्याचे काम करत आहे तर सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही भर पावसात रस्त्यावर उतरली. 

वसई विरार महापालिकेच्या लोकसंख्येचा अनुषंगाने लसीकरण डोस उपलब्ध करून देणे हे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनची जबाबदारी आहे. 

परंतु स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारा लसीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नसून सुस्त बसले आहेत.

वसई तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर सध्या वशिलेबाजी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने भरपावसात ८०० ते १००० कार्यकर्त्यांना सोबत मिळून जिल्हाध्यक्ष श्री राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या नियमांचे पालन करून शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी महापालिका मुख्य कार्यालया वर भव्य मोर्चा काढला.

केंद्रावर चालू असलेली वशिलेबाजी थांबवावी तसेच जेष्ठ नागरिकांना श्रम न करता लस मिळावी 18 ते 44 वयोगतील तरुणांना जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी नाहीतर या पुढे आंदोलन उग्र स्वरूप धारण करील असा इशारा जिल्हा अध्यक्ष राजन नाईक यांनी दिला.


केंद्र सरकार कडून मिळणारी लस ही 75% सामान्य नागरिकांना व 25% कंपन्यांना मिळावी असे निर्देश असताना वसई तालुक्यात मात्र नेमके उलटे चित्र दिसत असून हा मोठा घोटाळा असल्याचे जिल्ह्चे ओबीसी सरचिटणीस निलेश राणे यांनी शक्यता व्यक्त केली..

यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि देहेरकर यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल तसेच नागरिकांना टोकन देऊन लसीकरण देण्यात येईल असे आश्‍वासनही दिले.


सदर आंदोलनाला जिल्ह्याचे सरचिटणीस श्री.महेंद्र पाटील, उत्तम कुमार, राजू म्हात्रे तसेच महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रज्ञा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.अभय कक्कड, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री.नरेश पाटील, सरचिटणीस श्री.निलेश राणे तसेच सर्व जिल्हा, शहर, वॉर्ड पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्तिथी होती...!!

न्यूज 24 खबर 
विरार प्रतिनिधी  : सनिल माहिमकर 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools