मुकुटबनचे ठाणेदार व सहाय्यक फौजदाराने 50 हजार घेऊन चोरीचा खोटा गुन्हा केला दाखल असा आरोप
पैसे घेतल्याचा ऑडिओ रेकॉर्डींग तक्रार कर्त्याजवळ उपलब्ध असा दावा
सहाय्यक फौजदार, तत्कालीन रायटर व होमगार्ड यांची महत्वाची भूमिका जिल्हा पोलिस अधिक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार निलंबनाची कार्यवाही न केल्या कुटुंबीयसह आमरण उपोषणचा दिला इशारा..
यवतमाळ: झरी तालुक्यात मुकुटबन पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी 50 हजार रुपये घेऊन चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सह वरिष्ठ अधिकारी यांच्यावर करून त्वरित निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यूज 24 खबर प्रतिनिधी नितीन मनवर यांची प्राप्त महितीनुसार मुकुटबन येथील रहिवासी असलेला दीपक उदकवार हा हॉटेल व्यावसायिक असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने ड्रायवर याला कुठे रेती मिळत असेल तर आणायला सांगितले.
रेती घेऊन येत असताना येडशी गावाजवळ ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी पहाटे 6 वाजता ट्रक्टर पकडला व कोणताही पंचनामा न करता जप्त करून पोलीस स्टेशनला लावला.
ट्रक्टर मालक दीपक उदकवार याला 9 वाजता ठाण्यात बोलाविले. ठाण्यात दीपक गेला असता ठाणेदार सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते .
दोघांनीही दीपक याला 1लाखाची मागणी केली व तू पैसे न दिल्यास तुझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठवाला लावतो असे धमकावले.
1 लाख रुपयाच्या मागची तडजोड करण्याकरिता 12 वर्ष मुकुटबन येथे असलेले तसेच ठाणेदार सोनुने यांचा तत्कालीन रायटर सुलभ उईके याने मोबाईलद्वारे दीपक याला फोन करून तसेच दबाव टाकून 1 लाखावरून 50 हजाराची दबाव टाकून मागणी केली व तडजोड झाली.
कोणताही गुन्हा दाखल न करण्याचे 50 हजार देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी 50 हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर याला दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले.
होमगार्ड मोहितकर हा हॉटेल मध्ये जाऊन दीपक यांच्या पत्नी जवळून बळजबरीने 50 हजार रुपये घेऊन ठाणेदार सोनुने याना दिले.
याबाबतची रेकॉर्डींग सुद्धा तक्रार कर्ते जवळ आहे.
50 हजार देऊन सुद्धा ठाणेदार व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार याच्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याने मानहानी झाली व समाजात बदनामी झाली.
ट्रॅक्टर पकडून आणला तेव्हा दीपक हॉटेल मध्ये होता ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल न करता 50 हजार घेऊन हेतुपुरस्सर माझ्यावर खोटा चोरीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला.
इज्जत व भीती पोटी पैसे देऊनही गुन्हा दाखल करण्यात आल्याने समाजात दीपक याची मोठी मानहानी झाली व आर्थिक नुकसानही झाली.
घटनेच्या दिवसाचे सकाळी 5 ते 10.30 पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज काढल्यास होमगार्ड मोहितकर हॉटेलमध्ये 50 हजार घेत असतांनाची रेकॉर्डिंग पुरावा म्हणून मिळणार हे नक्की.
पोलीस स्टेशनच्या लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही रेकॉर्डिंग झाल्याची माहिती आहे व तसा अंदाज ही वर्तविला जात आहे.
घटनेच्या दिवसाचे फुटेज काढल्यास ठोस पुरावा हाती लागेल. पैश्याची मागणी करणारे ठाणेदार धर्मा सोनुने सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तसेच पैसे देण्यास मोबाईल वरून तडजोड करून पैसे देण्यास भाग पडणारा तत्कालीन रायटर सुलभ उईके व पैसे घेऊन जाणारा होमगार्ड निखिल मोहितकार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग व शासकीय कर्तव्यात कसूर केले आहे .
तरी वरील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 बॉम्बे पोलीस शिक्षा व अपील) नियम1956, बॉम्बे पोलीस फायदा 1951) भारतीय पुरावा कायदा 1872 फौजदारी प्रक्रीया कागदा 1973 भारतीय दंडनहिंता 1860 या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करित निलंबित करण्यात यावे अन्यथा कुटुंबियासह आमरण उपोषण करणार असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकसह वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे..
0 Comments