गडहिंग्लज : दि. 3 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने नांगनूर ता. गडहिंग्लज येथे भिंत अंगावर कोसळून 3 शेतमजुरांचा भिंतीखाली गाडले गेल्याने जागीच मुर्त्यु झाला होता.
त्यामुळे संपूर्ण कुंटुंब उद्धवस्त झालेले होते, तिघेही एकाच कुटुंबातील कर्ते व कमावते गेल्याने कुटुंबातील 9 कोवळी शाळकरी मुले ही अनाथ झाली होती.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व टीम 'वंचित' कोल्हापूर सर्व प्रथम त्या ठिकाणी पोहचली व त्या 9 अनाथ मुलांच्या मदती साठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहना प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मा.सुरेश थरकार, जिल्हा प्रवक्ते व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लजचे मा.प्रा.डॉ.ज्ञानराजा चिघळीकर, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष मा.अर्जुन दुण्डगेकर, मनोहर दावणे, नांगणुर गावचे रवींद्र कांबळे, अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ' टीम ' गडहिंग्लज ने सर्व प्रथम तालुक्यातून 35 हजार रोख रुपये व 1 पोते धान्य मदत रुपांनी गोळा करुन त्या अनाथांना दिले.
मा.जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आजच्या घडीला तरी वंचित बहुजन आघाडी त्या अनाथांची... "नाथ" झाली आहे असे जिल्ह्यातील जनतेचे बोलणे आहे.
न्यूज 24 खबर
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments