नाशिक : मालेगाव येथील सभापतींची निवडणूक चारही निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नगरसचिव श्याम बुरकुल व मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत पार पडली.
भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे भरत बागुल यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने सेनेच्या सौ कल्पना विनोद वाघ यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, सखाराम घोडके, सेनेचे उपमहापौर निलेश आहेर, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव, नगरसेविका प्रतिभा पवार, जिजाबाई पवार, आशा अहिरे, पुष्पा गंगावणे व जिजाबाई बच्छाव उपस्थित होते.
तसेच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सलग दुसऱ्यांदा कल्पना वाघ यांना संधी दिली व त्या निवडून आल्या. यामुळे वाघ परिवाराने भुसे साहेबांचे आभार मानले.
शिवसेना कार्यालयासमोर या निमित्ताने कल्पना विनोद वाघ यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यालय संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक अविष्कार भुसे, मनोहर बच्छाव, भीमा भडांगे, विनोद वाघ,राजेश गंगावणे, पप्पू पवार, प्रकाश अहिरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments