रत्नागिरी : जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्याने चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर खेडमध्ये नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेत शिरण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी तालुक्यात चांदेराई येथे पुराचे पाणी घुसले आहे. काळजी नदीला आलेल्या पुरामुळे हे पाणी बाजारपेठेत घुसले आहे.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला बसला फटका बसला आहे. चिपळूण शहरातील बहादुरशेख भागात पाच फुटापेक्षा पाणी आले आहे. याचा पुराचा फटका तिथल्या दुकानांवर बसला आहे. तर शहरातील अनेक भागात भरले पाणी बाजार पेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, ठिकाणी या परिसरात पाणी भरले आहे.
खेडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड बहिरवली फाटा येथे पुराचे पाणी आले आहे.
दापोली - खेड रोड संपुर्ण पाण्याखाली पहाटे 4.30 वाजल्यापासुन पाणी रस्त्यावर 2005 च्या पुरापेक्षा पाण्याची पातळी जास्त आहे.
रत्नागिरीतील चांदेराई जवळच्या काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. बाजारपेठेत चार फुटांचे पाणी आले आहे. चांदेराई, लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावरतीही पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे..
रत्नागिरी प्रतिनिधी : विकास धुत्रे
0 Comments