रत्नागिरी : खेड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे पोसरे बौद्धवाडी येथे तब्बल १७ जण दरडीखाली असल्याची भीती आहे तर बीरमणी येथे दोन जण अडकले आहेत.
पोसरे बौध्दवाडीमध्ये १७ व्यक्तींसह २५ गुरे दरडीखाली दबली गेली असल्याचीआणि सात घरे जमीनदोस्त झाली आहेत अशी माहिती पुढे आली आहे.
या ठिकाणी एनडीआरफची टीम पाठवण्यात आली आहे. एनडीआरफची आणखी एक टीम बोलावण्यात आली आहे.बीरमणी येथेच अलीकडे दोन किमीचा रस्ता खचला आहे अशी माहिती मिळत आहे.
खेड तालुका प्रशासनाने मदतकार्य सुरु केले परंतु खूप कमी प्रमाणात मदतकार्य सुरू आहे .
संबंधिताना सूचना देऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी रिपाईचे युवक अध्यक्ष विकास धुत्रे, तालुका सरचिटनिस सुरेंद्रदादा बोरजकर, युवानेते नितेश धोत्रे यांनी केली आहे..
रत्नागिरी प्रतिनिधी : विकास धुत्रे
+919405700931
0 Comments