खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जिल्हात शनिवार व रविवार पैकी एक दिवस शिथिलता मिळण्याबाबत चर्चा

नाशिक : जिल्हात शनिवार व रविवार पैकी एक दिवस शिथिलता मिळण्याबाबत चर्चा झाली. 

याबाबत शासनाला कळवणार आहोत. आम्ही निर्बंध काढू शकत नाही, फक्त लादू शकतो. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनच्या निर्बंधावर जो काही निर्णय होईल तो शासन स्तरावर होणार आहे

त्यामुळे सध्या नाशिकमधील निर्बंध जैसे थे असतील मात्र, शुटींगसाठी नाशिकसह त्र्यंबक परिसरात परवानगी देण्यात आली आहे. 
(Permission for Shooting in Trimbak and Nashik Area) 

अशी माहिती राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली 

ते नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत आहिरे, डॉ.निखिल सैंदाने, डॉ.संजय गांगुर्डे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते..

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, रुग्ण कमी होत असले तरी काळजी घ्यावी लागेल पण निर्बंधांबाबत शासनच निर्णय घेईल. लसीकरण केंद्रावर उपलब्ध लस साठ्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन केंद्रावर गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल.

शहर व परिसरात चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात यावी. नाशिकला अधिक प्रमोट करण्यास अधिक प्राधान्य देण्यात यावे. 

व्यवसायांना ४ वाजेच्या वेळेत बदल करून ५ वाजेपर्यंत करण्यात यावी शनिवारी देखील व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळावी तसेच रविवारी मात्र बंद ठेवण्यात यावे याबाबत शासनाकडे मागनी करणार आहेत. यावर पूर्णपणे निर्णय शासन दरबारी होणार आहे. सद्यस्थितीत नाशकात निर्बंध कायम असतील..
रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण कमी गतीने होत आहे. ९८ टक्के ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आहे. केवळ २ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ६७ रुग्ण उपचार घेत आहे बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत ३१ ऑक्सिजन जनरेशन प्लँट चे काम पूर्ण होणार. 

शहरात २४० मेट्रिक टनचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १५२ मेट्रिक टनची क्षमता निर्माण झाली आहे. वायू सेनेने भरती साठी परवानगी मागितली ती देण्यात आलेली आहे.

पावसाची सरासरी अद्याप कमी असून धरण समूहाची टक्केवारी ५० टक्क्यापर्यंत गेलेली नाही. जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट अद्याप टळलेले नसल्याचे भुजबळ याप्रसंगी म्हणाले..
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर 
+91 75076 27329

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools