राहुरी : खेळाविषयी कमालीची उदासीनता अपरिपक्व व दुरदृष्टीचा अभाव असलेल्या नेतृत्वाने आज पावेतो देवळाली प्रवरा मध्ये क्रीडा संकुल उभारले नाही.
त्यामुळे राज्यकर्तांच्या या अनास्थेने तरुणाईच्या तंदुरुस्तीचा आणि खेळाचा खेळखंडोबा झाला असल्याचे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी प्रतिपादन केले.
येथील शिवनेरी क्लबच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेचा सराव करणेसाठी राहुरी अर्बन पतसंस्थेच्या वतीने क्रीडा साहित्य प्रदान करणेत आले त्या प्रसंगी ढुस बोलत होते..
पुढे बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, खेळाविषयी कमालीची उदासीनता न् अपरिपक्व व दुरदृष्टीचा अभाव असलेल्या नेतृत्वाने आज पावेतो देवळाली प्रवरा मध्ये क्रिडागण उभारले नाही.
त्यामुळे राज्यकर्तांच्या या अनास्थेने तरुणाईच्या तंदुरुसुस्तीचा आणि खेळाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.
संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेली व एकेकाळी क वर्ग नगरपरिषदे मध्ये राज्यात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत खेळाडूंसाठी अद्याप पर्यंत क्रीडा संकुल होऊ शकले नाही
हे येथील खेळाडूंच्या दृष्टीने मोठे दुर्दैव म्हणावे लागेल किंवा राज्यकर्त्यांना त्याची गरज वाटली नाही हे येथील खेळाडूंचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
राहुरी अर्बन सारख्या दानशूर संस्था खेळाडूंना मदत करण्यासाठी समोर येत असल्याने येथील खेळाडू त्यांच्या खेळात तग धरुन आहेत.
खेळाडूंनी हिम्मत सोडू नये, मेहनत करून स्वतःला सिद्ध करावे म्हणजे अश्या खेळाडूंना मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकू.
राहुरी अर्बन खेळाडूंसाठी धावून आली त्यामुळे येथील खेळाडू लवकरच राष्ट्रीय पातळीवर चमकताना आपणास दिसतील अशी अपेक्षा करून मदत केल्या बद्दल राहुरी अर्बन चे आभार व्यक्त करतो व खेळाडूंना शुभेच्छा देतो.
शिवनेरी क्लबच्या ज्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड होईल त्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व क्रीडा साहित्याचे संपूर्ण किट राहुरी अर्बन तर्फे उपलब्ध करून देणेत येईल
असे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी सांगितले.
योग प्रशिक्षक किशोर थोरात यांनी व्यायाम व योगाचे खेळातील महत्त्व विशद केले व डॉ विलास पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी राहुरी अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, संस्थेचे संचालक तथा योग प्रशिक्षक किशोरजी थोरात, डॉक्टर केमिस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विलास पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशिक्षक पुजारी सर व खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षक पुजारी सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले..
न्यूज 24 खबर
अहमदनगर राहुरी प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट
0 Comments