केदारेंना सध्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे एपीआय बेडवाल यांना संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान केदारे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पाहण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात गर्दी केली आहे. पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे.
केदारेंची प्रकृती गंभीर हॉस्पीटलबाहेर गर्दी बाबत पोलिसांनी माहिती दिली की सोमवारी ता.२६ रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास बडदे नगर ते पाटील नगर परिसरात अज्ञात टोळक्यांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे.
दरम्यान मागील भांडणाची कुरापत काढून या तरुणास मारहाण केली असल्याचे समजते.
रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बेडवाल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते..
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर
+91 75076 27329
0 Comments