नाशिक : नापीकी व रोगराई, शेतातून हवे तितके उत्पन्न मिळत नसल्याने यातुन आर्थिक संकट उद्भवल्याचे दिसून येत आहे व इतर कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात विभागातील ५०२ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.
चालू वर्षात जानेवारी २०२१ ते जून २०२१ दरम्यान १५१ व्यक्तींनी आत्महत्या केल्या व २०२० मध्ये ३५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून १२९ व्यक्तीच शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. मात्र सततच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी या ना त्या कारणाने आर्थिक संकटात येत आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकरी बांधवाकडून टोकाचे पाउल उचलून गळफास घेत व विषारी औषध घेउन जीवन संपविले जात असल्याचे समोर येत आहे.
चालू वर्षात आत्महत्या केलेल्यापैकी ४५ शेतकरी कुटूंब शासकीय मद्तीसाठी पात्र ठरले आहे तर ३६ जणांचे अहवाल अपात्र ठरविण्यात आले. ७० जणांचे अहवाल प्रलंबित आहे. पात्र शेतकर्यांना एक लाखाची मद्त केली जाते. २०२० वर्षामध्ये नाशिक विभागात एकुण ३५१ शेतकरी बांधवांनी आयुष्य संपविले, यात नाशिक ४४, धुळे ६५, नंदूरबार १०, जळगांव १३१, नगर ९१ शेतकरी आत्महत्या केल्या.
शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शेतकरी वर्गाकडून आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जात आहे, यासाठी शासनाकडून गाव पातळीवर ठोस उपाययोजणा करण्याची गरज आहे.
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर
न्यूज 24 खबर
0 Comments